लाइव न्यूज़
हजरत मन्सुर शाह वली (रहे) उर्दु माध्यमिक शाळेत बक्षीस वितरण,पुरस्कार व सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न
Beed Citizen | Updated: February 8, 2018 - 3:36pm
बीड (प्रतिनिधी):- हजरत मन्सुर शाह वली (रह) उर्दु मा. शाळेत विद्यंार्थ्यांस तसेच शैक्षणीक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या मान्यवरास सलाम एज्युकेशनल ऍण्ड ऑदर वेलफेअर सोसायटी, बीड साप्ताहीक अजान ए.अदम, हुदा एज्युकेशन सोसायटी व हमदर्द पब्लीक लायब्ररी तर्फे बक्षीस व पुरस्कार वितरण समारंभ राम-कृष्ण लॉन्स, अंबीका चौक शाहु नगर बीड येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माार्गदर्शक मोहम्मद इब्राहीम अन्वरी हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे प्रो.फरीद अहेमद नेहरी, प्रो.फर्रा फातेमाा नेहरी, डॉ.शेख एजाज परवीन, डॉ.शेख रफिक इसहाक, डॉ.सय्यदा तन्वीर, बदरोद्दीन(सर्व प्राध्यापक मिल्लीया सिनीयर कॉलेज) एजाज सर (सचिव मुन एज्युकेशन सोसायटी, गेवराई) मोमीन सुमय्या फातेमा (प्राचार्य बदर इंटरनॅशनल स्कुल, गेवराई), शफीक फारोखी व शेख अखलाख उपस्थित होते. शैक्षणीक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल प्रो.फरीद अहेमद नेहरी, प्रा.फर्रा फातेमा नेहरी, डॉ.शेख एजाज परवीन, डॉ.शेख रफिक इसहाक, डॉ.सय्यदा तन्वीर, बदरोद्दीन, एजाज सर, मोमीन सुमय्या फातेमा, मोहम्मद सफी अन्वरी, सय्यद अमीनोद्दीन, सय्यद सज्जाद, डॉ.शफीका अन्वरी, शेख रमजान पटेल, सय्यद शाजीया, शेख सोफीया यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला. तसेच शमशेर खान पाशा खान व शेख जुबेर शेख हुसेन यांना उत्तम सेवेबद्दल पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्गदर्शक मोहम्मद इब्राहीम अन्वरी अभिनंदन केले. पुर्वीचे विद्यार्थी जास्त श्रम करत नव्हते. आता शिक्षक जास्त श्रम करतात. विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी प्रोत्साहन देतात. शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद सफी अन्वरी, कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांना पुढील प्रगतीसाठी प्रेरणा देवुन उत्कृष्ट कामगिरी करणार्या मान्यवरांस पुरस्कार देण्यात येत असल्याचे सांगीतले. सचिव मोहंम्मद असलम अन्वरी यांनी धर्म(कुरआन) व शिक्षणाचे महत्व विशद केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न केल्याबद्दल सचिव साहेबांनी सर्व शाळांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे कौतुक केले. प्रमुख पाहुणे फरीद अहेमद नेहरी यांनी शिक्षणाचे महत्व व गरज याबद्दल बोलुन व प्रा.फर्रा फातेमा नेहरी यांनी अभ्यासक्रमातील उणीवा स्पष्ट केल्या. त्यानंतर रंगारंग समुहगीत, शैक्षणीक व सामाजीक विषयावर उत्कृष्ट नाटके सादर केली. उपस्थित शेकडोच्या संख्येने पालक मंडळी व पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे खुप कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिन्हाज अहेमद खान व शेख सोफीया यांनी केले तर शाळेचे मुख्याध्यापक मो.सफी अन्वरी यांनी आभार व्यक्त केले.
Add new comment