लाइव न्यूज़
विस्तार अधिकारी संतोष जगताप यांचे निलंबन
युवा सेनेच्या आंदोलनाला यश-सुशिल पिंगळे
बीड (प्रतिनिधी) बेरोजगारांना फसवणार्या जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी संतोष जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशिल पिंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या मागणीला यश आले असून विस्तार अधिकारी संतोष राख यांचे निलंबन युवा सेनेच्या आदंोलनामुळे झाल्याचे सुशिल पिंगळे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
जिल्हा परिषदेत आरोग्य विभागाअंतर्गत शासकीय नौकरी लावण्याचे आमिष दाखवून शेकडो सुशिक्षीत बेरोजगारांकडून लाखो रूपये विस्तार अधिकारी संतोष जगताप यांनी उकळले. त्यांची फसवणूक करून विस्तार अधिकारी जगताप हा राजरोसपणे आपल्या कार्यालयात बसत होता. हा प्रकार युवा सेनेला कळल्यानंतर या विरोधात आंदोलन उभा करण्याचे आम्ही ठरवले. या प्रकरणी प्रशासनाने गांभिर्याने पावले उचलून बेरोजगारांना नौकरीचे आमिष दाखवणार्या आणि गंडा घालणार्या रॅकेटचा पर्दाफाश करावा. अशी मागणी निवेदनाद्वारे केल्यानंतर याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने सदरील विस्तार अधिकारी संतोष जगताप यांचे निलंबन केले आहे. युवा सेनेच्या आंदोलनाला यश आले असून यापुढे कुठल्याही अधिकार्याने सुशिक्षीत बेरोजगारांना किंवा जनतेला फसवू नये असा ईशारा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशिल पिंगळे यांनी दिला आहे.
Add new comment