लाइव न्यूज़
आरटीई प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू ऑनलाईन अर्ज भरण्याची २८ फेब्रुवारी अंतीम मुदत
Beed Citizen | Updated: February 10, 2018 - 2:54pm
बीड (प्रतिनिधी) शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत पुढील शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी आजपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरण्याची अंतीम मुदत २८ फेब्रुवारी आहे.
लॉटरी पध्दतीने प्रवेशाची पहिली यादी जाहिर करणे तसेच प्रवेश घेणे, प्रवेशाच्या पुढील फेर्या आदिंचे वेळापत्रक नंतर जाहिर केले जाणार आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया उपक्रमांतर्गत गरिब घरातील मुलांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळावे यासाठी सर्व शाळांमधील २५ टक्के प्रवेश राखीव ठेवले जातात. या संपूर्ण प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवली जाते. विद्यार्थ्यांच्या पालकांना या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे. असे प्राथमिक विभागाचे उपसंचालक शरद गोसावी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे म्हटले आहे. पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी पालकांना १० ते २८ फेब्रुवारी या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर लॉटरी पध्दतीने प्रवेशाची यादी जाहिर केली जाईल. पालकांना शाळेत जावून प्रवेश घेण्यासाठी मुदत दिली जाईल. त्यानंतर बाकीच्या जागांच्या प्रवेशासाठी पुढील फेर्यांचे वेळापत्रक जाहिर केले जाणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले आहे.
Add new comment