बीड शहर

बीड बायपासवर पुन्हा अपघात क्लिनर ठार; चालक जखमी

बीड (प्रतिनिधी) दोन मालवाहु ट्रकची समोरासमोर धडक होवून झालेल्या भिषण अपघातात क्लिनर जागीच ठार झाला. तर चालक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बीड बायपासवरील इमामपुर रोडजवळ घडली. अपघातात दोन्ही वाहनांचा समोरील भाग चक्काचुर झाला आहे.

पोलिस शिपायावर सेवानिवृत्तीनंतरही अन्याय ; अनुकंपा तत्वावर मुलाला घेण्यास गृहविभागाकडून नकार

बीड : पोलिस शिपाई म्हणून काम करत असताना अचानक काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केला, यात जखमी झालेल्या पोलिस शिपायाला नोकरी करण्यास सक्षम नसल्यावरून सेवानिवृती व्हावे लागले. पुढे मुलाला अनुकंपावर घेवू असा तत्कालीन पोलिस अधिक्षकांनी सांगितले. एवढेच नाही तर राज्य गृहविभागाशी याबाबत पत्रव्यवहार देखील झाला. या सर्व प्रकाराला सात वर्ष झाले मात्र अजूनही त्या हल्ला झालेल्या पोलिस शिपायांच्या मुलाला पोलिस दलात अनुकंपावर घेतलेले नाही. याप्रकारामुळे आयुष्यभर कायद्याच्या रक्षणाचे काम करणारे भिमराव यल्लप्पा मुंजाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पोरवाल दाम्पत्यांने दत्तक घेतलेल्या चिमुकलीचे  शेकडो भाविकांच्या उपस्थितीत नामकरण 

बीड(प्रतिनिधी)बीड तालुक्यातील नेकनूर येथील स्त्री कुटीर रुग्णालयात प्रसुतीदरम्यान मातेचा मृत्यू झाला. मातृछत्र हरपलेल्या त्या चिमुकलीचा सांभाळ करण्यास असमर्थ ठरलेल्या पित्याने जड अंतःकरणाने तिला अनाथाश्रमात सोडण्याचा निर्णय घेतला होता, पण महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेऊन त्या चिमुकलीला आई-वडिलाचे छत्र मिळवून दिले अन् बीड येथील प्रशांत पोरवाल व त्यांच्या पत्नी सौ.बरखा प्रशांत पोरवाल यांनी चिमुकलीचे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन दत्तकत्वही स्विकारले.

श्री एकता मित्र मंडळाचे सामाजीक काम इतरांसाठी आदर्श ठरेल - अॅड देशमुख

बीड ( प्रतिनिधी ) बीड शहरात श्री एकता मित्र मंडळाने 'आनंद द्या - आनंद घ्या - आनंदी रहा' हा आपला उद्देश चांगलाच जपला आहे. मंडळाने जिल्हा स्टेडियम वर चालण्या फिरण्याच्या व्यायामाबरोबरच सामाजीक उपक्रमात चांगला सहभाग नोंदवला आहे. आता आणखी जादा सहभाग नोंदवून जिल्ह्याला एक नवा पायंडा पाडून द्यावा. मंडळाचे काम इतरांसाठी आदर्श ठरेल, असे मत जेष्ठ समाजसेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी व्यक्त केले.

खुदाई खिदमदगार सोशल फाउंडेशनच्यावतीने  महारक्तदान व व्याख्यान कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहा .अय्युब खान

बीड, (प्रतिनिधी):- येथील खुदाई खिदमदगार सोशल फाउंडेशन या पठाण संघटनेच्यावतीने भारतरत्न सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या जन्मदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे या मध्ये प्रामुख्याने दि ५ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ११ वाजता मिल्लिया महाविद्यालयाच्या आडीटोरीयम हाल येथे अहमदनगरचे प्रसिद्ध वक्ते पठाण अमजद खान व इतर मान्यवरांचे ‘ खान अब्दुल गफार खान यांचे स्वतंत्र लढ्यातील योगदान ‘ या विषयावर व्याख्यान व दि.

दोन वर्षांपासून आम्रपाली जगतेय हालाकीचे जीवन!

जिल्हा रुग्णालय नेहमी  येथे उपचारासाठी भरती होत असलेल्या रुग्णांना पुरेसी सेवा न देणे,साफसफाई न राखणे एखाद रुग्ण छवविच्छेदन साठी त्याच्या नातेवाईकांना तासंतास लाटकवत ठेवणे ह्या कारणासाठी चर्चेत राहते परंतु या जिल्हा रुग्णालयातील काही डाक्टर,  नर्स आणि कर्मचारी हे हे आज ही रुग्णसेवा ही ईश्वर सेवा म्हणून सेवा देतात या रुग्णालयात बर्न वार्डात मागील  दोन वर्षांपासून  एक बावीस वर्षीय भाजलेल्या मुलीस या बर्न वार्डातील कर्मचारी आणि नर्स आधार देत आहेत,  

बीडमध्ये ७८ मोटारसायकलींवर कारवाई

बीड (प्रतिनिधी) शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीत आज सकाळपासून ७८ मोटारसायकलींवर कारवाई करण्यात आली आहे. कागदपत्र नसलेल्या वाहनधारकांविरूध्द पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून शहर आणि अन्य पोलिस ठाणे हद्दीतही अशा वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीत पीएसआय काळे, तांबारे, बांगर, गर्जे यांनी ७८ मोटारसायकलींवर कारवाई केली. वाहनाचे कागदपत्र, लायसन्स नसलेल्या वाहनधारकांविरूध्द ही कारवाई करण्यात आली आहे

भाजपा भ्रमनिरास पार्टी-घोळवे

बीड जिल्ह्यातील सर्व जागा शिवसेना स्वबळावर लढवणार
शिवसेनेकडून नव्हे तर भाजपकडूनच गडाचे राजकारण-घोळवे

सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांचा मुकमोर्चा पाल्यांना पोलिस बॉईज म्हणून सवलतीची मागणी

बीड (प्रतिनिधी) सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी सेवा समितीच्या वतीने आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला. निवृत्त अधिकारी, कर्मचारी यांना ते हयात असेपर्यंत शासकीय कुटूंब आरोग्य योजना लागु करण्यात यावी, पाल्यांना भरतीमध्ये १५% पोलिस बॉईज म्हणून सवलत मिळावी आदि मागण्यांचे निवेदन समितीने जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

शालार्थ प्रणालीत तांत्रिक दोष; शिक्षकांचे जानेवारीतील वेतन होणार ऑफलाईन

बीड (प्रतिनिधी) राज्यातील शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन काढण्यात येते. मात्र प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअरमध्ये वीस दिवसांपासून तांत्रिक दोष निर्माण झाल्याने ती प्रणाली सध्या बंद पडल्याने जानेवारी २०१८ चे वेतन रखडले आहे. यासंदर्भात विविध शिक्षक संघटनांनी पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनाच्या शालेय विभागाने १ फेब्रुवारी रोजी परि पत्रक काढून शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे माहे जानेवारी २०१८ चे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

निकाल लागेपर्यंत फारूक पटेल यांची जागा रिक्त ठेवण्याचे आदेश

बीड (रिपोर्टर) येथील नगर पालिकेतील नगरसेवक फारूक पटेल यांनी अपात्रतेच्या विरूध्द उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सदर याचिका निकाली काढतांना न्यायालयाने निकाल लागेपर्यंत पटेल यांच्या जागी निवडणूक न घेता सदर जागा रिक्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आघाडीचे नगरसेवक फारूक पटेल यांनी जिल्हाधिकारी यांच्या अपात्र ठरवल्याच्या आदेशाविरोधात राज्यमंत्री नगरविकास यांच्याकडे अपील दाखल केले होते. मात्र राज्यमंत्र्यांनी दि.३०-१०-२०१७ रोजी दिलेली स्थगिती ५-१-२०१८ रोजी उठविली होती.

इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने हाताची नस कापली आत्महत्येचा प्रयत्न; नातेवाईकांची कॉलेजविरूध्द तक्रार!

बीड (प्रतिनिधी) शहरातील यशवंतराव चव्हाण पॉलटेक्नीक कॉलेजमध्ये इंजिनिअरींगच्या वर्गात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याने आज सकाळी हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान महाविद्यालय प्रशासनाने शुल्क भरण्यासंबंधी तगादा लावल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून या प्रकरणात तक्रार देणार असल्याचे संबंधीतांनी सांगितले.

मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळमुदत शैक्षणिक कर्ज online अर्ज करण्यासाठी मुदत वाढ

महाराष्ट्र शासनाचे, अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत असलेल्या मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्या. मुंबई मार्फत महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक ( मुस्लिम,बौद्ध, जैन, सिख,खिश्चन,पारसी व ज्यू ) या समुदायातील गरजु विद्यार्थींकरिता व्यवसायिक, तांत्रिक या सारख्या उच्च अभ्यासक्रमाकरीता (उदा.MBA,MBBS,BAMS,BE, IT.)  दि.10/10/2017 पासून online शैक्षणिक कर्ज योजनेचे अर्ज सन 2017 -2018 या वर्षासाठी स्विकारली जात आहे.

चौसाळ्यात दिड लाखाचा गुटखा पकडला,एसपी पथकाची कारवाई

चौसाळा (प्रतिनीधी)
अाज सकाळी चौसाळा येथे गुटख्याच्या साठ्यावर पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांच्या पथकाने छापा टाकला या मध्ये तब्बल दिडलाखाचा गुटखा जप्त करण्यात अाला असुन अन्न औषद विभागाच्या ताब्यात पुढील कार्यवाही साठी देण्यात अाला
चौसाळा येथे मंगेश विकृम वाघ यांच्या पञ्याच्या शेड मध्ये ठेवलेल्या एक्का नावाचा गुटख्यावर अाज सकाळी पथकाने छापा टाकला या मध्ये १,२८.५७० रुपयाचा गुटखा जप्त करण्यात अाला हि कारवाई पथकातील एपीअाय अमोल धस,देशमुख,शिंदे,पवार,नवले,वंजारे,यांनी केली

बीड जिल्ह्यात कांद्याचं गाव! अख्या गावांने घेतले २५ कोटींचे उत्पन्न

बीड (प्रतिनिधी) गावाची संस्कृती हे गावाचे व्यक्तीमत्व असे म्हटले जात असले तरी तेथील ग्रामस्थांनी शेतात राब राब राबुन घाम टपकावत मिळवलेली ओळख वाखानण्याजोगी असते. याची प्रचीती बीडसांगवी (ता.आष्टी) येथे येवू लागली आहे. पाच वर्ष भयानक दुष्काळाने छळल्यानंतर तेथील शेतकर्‍यांनी आता कुठे उभारी घेतली आहे नव्हे तर झेप घेतल्याचे स्पष्ट होवू लागले आहे. अख्या गावानेच कांद्याच्या पिकाचे उत्पादन घेत कोटींची मजल मारली आहे.

दिनेश मुंदडा यांच्या भगिनी तथा लेखिका अॅड.ज्योती कासट यांचे निधन

बीड (प्रतिनिधी) येथील माजी नगरसेवक दिनेश मुंदडा यांच्या भगिनी तथा सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्या, लेखिका ऍड.ज्योती गोविंद कासट यांचे र्‍हदयविकाराच्या धक्क्याने आज सकाळी निधन झाले. मृत्यू समयी त्या ४६ वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला असून सामाजिक चळवळीची मोठी हानी झाल्याच्या भावना व्यक्त होवू लागल्या आहेत.

हाजी खालेक पेंटर अाफताब सहाफत राज्यस्थरीय पुरस्काराने सन्मानीत

बीड(प्रतिनीधी) येथील दैनिक जंगचे संपादक हाजी अब्दुल खालेक पेंटर याना नांदेड येथील खादमिने उम्मतच्या वतीने दिनांक २८ जानेवारी २०१८ रोजी नांदेड येथे हैदर गार्डन मध्ये मान्यवरांचा हस्ते मानसन्मान देउन राज्यस्थरीय अाफताब सहाफत पुरस्काराने सन्मानीत करण्यात अाले.

माळापुरीत विवाहितेची आत्महत्या; सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

बीड (प्रतिनिधी) एका २३ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी माळापुरी (ता.बीड) येथे घडली. दरम्यान संतप्त नातेवाईकांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करा या मागणीसाठी आक्रमक पावित्रा घेतला होता. अखेर आज सकाळी मयत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pages