लाइव न्यूज़
सरहद्द गांधी यांचे कार्य सर्वांना प्रेरणा देणारे-पठाण
पठान संघटना खुदाई खिदमदगार सोशल फाउंडेशनच्यावतीने व्याख्यान
बीड (प्रतिनिधी) भारतरत्न सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान यांचे कार्य उल्लेखनीय आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय असुन त्यांच्या कार्य सर्वांना प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन अहमदनगर येथील वक्ते पठाण अमजद खान यांनी केले. यावेळी पठाण संघटना खुदाई खिदमतगार सोशल फाऊंडेशनच्यावतीने अंजुमन इशाते तालिमच्या सचिव खान सबिहा बाजी यांचा शैक्षणिक कार्यालयातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
बीड शहरातील मिल्लीया महाविद्यालयात आज सकाळी खुदाई खिदमदगार सोशल फाउंडेशन या पठाण संघटनेच्यावतीने भारतरत्न सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या जन्मदिनानिमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी अहमदनगरचे प्रसिद्ध वक्ते पठाण अमजद खान, जमाअत इस्लामी हिंदचे शहराध्यक्ष सय्यद शफीक हाश्मी, प्रा.सुशीलाताई मोराळे, सभापती मुखीद लाला, ऍड.सय्यद खाजा, सुहास पाटील आदिंची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी ‘खान अब्दुल गफार खान’ या विषयावर यांचे व्याख्यान झाले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यासाठी जेष्ठ नगरसेवक जलील पठाण, नगरसेवक जयतुल्ला खान, इकराम खान, दि बी खान, माजी सभापती शकील खान, सिराज खान आरजू, चंदन पठाण, अय्युब रहीम खान, अमजद खान, बरकत पठाण, हाफिज मोबीन खान नदवी, प्रा.परवेज युसुफ जई, मुज्तबा अहमद खान, सलीम पठाण, रफिक पठाण, फेरोज पठाण, शेरजमा खान, डॉ.रशीद खान, खमर अन्ना खान, कौसर खान, समाजवादी जिल्हाध्यक्ष फेरोज खान, नूरलाला खान आदिंनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खुदाई खिदमदगार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अय्यूब खान पठाण यांनी केले. सुत्रसंचलन मोहंमद अबुबकर यांनी केले तर आभार मौलाना मुबीन खान यांनी मानले. या व ईतर मान्यवर उपस्थित होते
Add new comment