Add new comment

न.प.चे सेवानिवृत्त कर्मचारी हाजी बाबामियॉं यांचे निधन; सहारा ट्रॅव्हल्सचे मालक शेख अख्तर व शेख अन्वर यांना पितृशोक

बीड ( प्रतिनिधी ) येथील नगरपालिकेचे सेवा निवृत्तकर्मचारी हाजी बाबामियॉं शेख यांचे आज ( दि.४) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. सहारा ट्रॅव्हल्सचे मालक शेख अख्तर व शेख अन्वर यांचे ते वडील होते. मृत्यूसमय त्यांचे वय (८२) वर्षे होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बीड शहरातील बशीरगंज भागातील (बीएसएनएल टॉवरच्या पाठीमागे) रहिवासी असलेले नगरपालिकेचे सेवानिवृत्त हाजी बाबामियॉं यांचे आज सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. नगरपालिकेत कार्यरत असतांना त्यांनी विविध ठिकाणी कर्तव्य बजावले आहे. मनमिळावू स्वभावाचे म्हणून ते परिचित होते. शहरातील बशीरगंज भागातील सहारा ट्रॅव्हल्सचे मालक शेख अख्तर व शेख अन्वर यांचे ते वडील होते. आज रविवारी ( दि.४ ) दुपारी २ वाजता जोहरच्या नमाजनंतर तकीया मस्जिद परिसरातील कब्रस्तानमध्ये त्यांचा दफनविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शेख कुटुंबियांच्या दुःखात सिटीझन परिवार सहभागी आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.