लाइव न्यूज़
Add new comment
टेम्पोची मोटारसायकलला धडक; बारावीची प्रात्यक्षिक परिक्षा देवून घराकडे जाणारा विद्यार्थी ठार

केज (प्रतिनिधी) टेम्पोने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बरड फाटा (ता.केज) येथे आज दुपारी घडली. बारावीची प्रात्यक्षिक परिक्षा देवून घराकडे जात असतांनाच विद्यार्थ्यावर काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
केज तालुक्यातील नांदूरफाटा येथील विकास अशोक ठोंबरे (१८) हा सारणी सांगवी येथील महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. प्रात्यक्षिक परिक्षा दिल्यानंतर मोटारसायकल क्र.(एम.एच.२३ आर.४८०४) वरून तो सारणी सांगवी येथून नांदूरफाट्याकडे निघाला होता. त्याचवेळी टेम्पो क्र.(एम.एच.२३ ७५०८)ने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात विकास ठोंबरे याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
