Add new comment

गवळवाडी ग्रा.पं.मध्ये प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहनच झाले नाही गणेश मस्केंसह अनेकांची तक्रार

बीड (प्रतिनिधी) तालुक्यातील गवळवाडी येथील ग्रामपंचायतमध्ये प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहनच झाले नसल्याची तक्रार गणेश मस्के, बाळासाहेब मस्के, युवराज मस्के आदिंनी दिल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. १५ वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या सत्ताधार्‍यांनी ग्रामसभाही घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गवळवाडी ग्रामपंचायतमध्ये प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहन झाले नसल्याची तक्रार देण्यात आल्याचे गणेश मस्के यांनी पत्रकात म्हटले आहे. याठिकाणी ग्रामसभाही झाली नसून कागदोपत्री दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ग्रामसभेचे अध्यक्ष व उपसरपंच ठराव न घेता रजिस्टरसह निघून गेल्याचे पत्रकात म्हटले आहे. पत्रकात गणेश मस्के, बाळासाहेब मस्के, युवराज मस्के, बंडू मस्के आदिंची नावे आहेत.
 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.