Add new comment

विवाहितेची आत्महत्या

गेवराई (प्रतिनिधी) तालुक्यातील लुखा मसला येथील २८ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडीस आली आहे.
लुखा मसला येथील अल्का बप्पासाहेब नलबे (२८) या विवाहित महिलेने काल रात्री विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदरील प्रकरण आज सकाळी उघडीस आले. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याची प्रक्रिया दुपारपर्यंत सुरू होती.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.