लाइव न्यूज़
Add new comment
बीड पालिकेच्या मुख्याधिकार्यांना नोटीस लक्ष्मण नगर भागातील घरे पाडल्याचे प्रकरण

बीड (प्रतिनिधी) स्थगिती असतांनाही पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी शहरातील लक्ष्मण नगर भागातील घरांवर कारवाई केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने मुख्याधिकार्यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणात २२ मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
बीड शहरातील लक्ष्मण नगर भागातील १४ घरांवर पालिका प्रशासनाने कारवाई केली होती. या प्रकरणामध्ये न्यायालयाचे स्थगिती आदेश असतांनाही पालिकेच्या अधिकार्यांनी एका दिवसात सर्व घरे पाडल्याप्रकरणी आएशा बेगम मोहंमद अब्दुल्ला इनामदार यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणामध्ये न्यायालयाने नगर पालिकेच्या मुख्याधिकार्यांवर ठपका ठेवत नोटीस बजावली आहे. दि.२२ मार्च रोजी मुख्याधिकार्यांना न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणात ऍड.सय्यद तोसीफ यांनी याचिकाकर्त्यांची बाजु मांडली.
