पोलिस शिपायावर सेवानिवृत्तीनंतरही अन्याय ; अनुकंपा तत्वावर मुलाला घेण्यास गृहविभागाकडून नकार
बीड : पोलिस शिपाई म्हणून काम करत असताना अचानक काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केला, यात जखमी झालेल्या पोलिस शिपायाला नोकरी करण्यास सक्षम नसल्यावरून सेवानिवृती व्हावे लागले. पुढे मुलाला अनुकंपावर घेवू असा तत्कालीन पोलिस अधिक्षकांनी सांगितले. एवढेच नाही तर राज्य गृहविभागाशी याबाबत पत्रव्यवहार देखील झाला. या सर्व प्रकाराला सात वर्ष झाले मात्र अजूनही त्या हल्ला झालेल्या पोलिस शिपायांच्या मुलाला पोलिस दलात अनुकंपावर घेतलेले नाही. याप्रकारामुळे आयुष्यभर कायद्याच्या रक्षणाचे काम करणारे भिमराव यल्लप्पा मुंजाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बीड येथील रहिवाशी असलेले भिमराव यल्लप्पा मुंजाळ हे २०१० च्या दरम्यान माजलगाव येथे पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होते. याच दरम्यान माजलगाव येथील काही रिक्षावाल्यांनकडून भिमराव मुंजाळ यांच्यावर तलवारीने हल्ला झाला. यामध्ये त्यांना कायमचे अपंगत्व आले. पोलिस दलाकडून भिमराव यांना नौकरी करण्यास सक्षम नसल्याचे सांगितले. नाविलाजास्तव त्यांना सेवानिवृत्ती स्विकारावी लागली. पुढे भिमराव मुंजाळ यांचा मुलगा गणेश भिमराव मुंजाळ याला नियमाप्रमाणे अनुकंपावर पोलिस दलात घेण्यात येईल असे, तत्कालीन बीडचे पोलिस अधिक्षक यांनी सांगितले होते. यानंतर राज्य गृहविभागाशी याबाबत पत्रव्यवहार देखील झाला. एक वर्षाचा काळ गेला तरी देखील भिमराव मुंजाळ यांचा मुलगा गणेश मुंजाळ यांना पोलिस दलात अनुकंपा तत्वावर घेतले नाही. नंतर २०११ मध्ये विचारना करण्यात आल्यावर गृह विभागाकडून नियम बदलले आहेत. आता तुमच्या मुलाला अनुकंपातत्वावर घेता येणार नाही. असे लेखी स्वरूपात भिमराव मुंजाळ यांना गृहविभागाकडून सांगितले जातेय. या प्रकारामुळे भिमराव मुंजाळ यांनी नाराजी
व्यक्त केली आहे.
आत्मदहनाचा दिला इशारा..
मी आयुष्यभर पोलिस दलाची सेवा केलेली आहे. माझ्यावर झालेल्या हल्यामुळे मला अपंगत्व आलेले आहे. नौकरी करण्यास मी सक्षम नसल्याने मी सेवानिवृत्त स्विकारलेली आहे. आता माझ्या मुलाला पोलिस दलात अनुकंपावर घ्या ही मागणी २०१० ची आहे. मात्र आम्हाला नवा म्हणजेच २०११ नंतर चा नियम दाखवून डावलले जात आहे. आमच्या कुटुंबाचा उदनिर्वाह करण्याची जबाबदारी मुलावर आहे. तो पोलिस दलात काम करण्यास सक्षम आहे. असे असतानाही विलंब लावून आम्हाला डावलेले आहे. नियमाप्रमाणे पोलिस दलात घेता येते मात्र डावलले जात आहे. आता आत्मदहन करण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्यायच नाही असे भिमराव मुंजाळ यांनी बोलताना सांगितले.
Add new comment