Add new comment

पेठ बीड सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचा अवयव दानाचे संकल्प

बीड, (प्रतिनिधी):-सिंहसनाधीश ग्रुप आयोजित सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती पेठ बीड सन २०१८ ची कार्यकारिणी शनिवार दि.३ फेब्रुवारी रोजी संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक  बाळासाहेब गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर झाली. यावेळी अध्यक्षपदी अशोक परळकर यांची तर उपाध्यक्ष पदी विशाल जाधव यांची तर सचिवपदी आकाश निर्मळ, सहसचिव तुकाराम भांबरे, कोषाध्यक्ष आकाश चांदणे, सहकोषाध्यक्ष सोनू जाधव, प्रसिद्धीप्रमुख संदिप जगदाळे, रोहित जाधव, राहुल जगदाळे तर व्यवस्थापकपदी उमेश (सर) कोठी, संतोष कैवाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ यांनी आपले मनोगत मांडताना मंडळा कडून घेण्यात येणार्‍या विविध प्रकारच्या कार्यक्रमाची माहिती दिली त्यात अवयवदान शिबीर,गौ दान,महिलांची मोटारसायकल रॅली,स्वच्छता अभियान,वृक्षारोपण, निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा व विविध प्रकारच्या अनेक स्पर्धा, विविध कार्यक्रम मंडळाकडून घेण्यात येतील असे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले, यावेळी बैठकीला उपस्थित मान्यवर रतन (तात्या) सोनटक्के,भारत मस्के,थापडे मामा,दिनेश मोरे,अंबादास गुंजाळ,अनिल घोलप,विठ्ठल चौरे, अप्पा मोरे,गजेंद्र गाडे,संतोष बामणे,राम सवासे, बाळू गाडे, नितीन गरड,दत्ता जाधव, आकाश चांदणे,व सिंहसनाधीश ग्रुप चे सर्व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते शेवटी बैठकीत उपस्थित सर्वांचे आभार सुशांत सोनटक्के यांनी मानले

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.