लाइव न्यूज़
खाजगी वाहने चालतात परमिट परवान्यावर आरटीओंचा कानडोळा; प्रशासनाचा लाखोंचा महसुल पाण्यात
Beed Citizen | Updated: February 5, 2018 - 3:11pm
बीड (प्रतिनिधी) मुंबई मोटार अधिनियम १९५८ नुसार चारचाकी वाहन खरेदी केल्यानंतर त्याची पासिंगसाठी प्रादेशीक परिवहन अधिकार्याकडून वाहन संदर्भात संपूर्ण तपासणी करीत शासकीय नियमानुसार टॅक्स लावला जातो. यामध्ये खाजगी वाहन खरेदी करतांना वैयक्तीक कामांसाठी वापरण्यात येणार्या वाहनावर वन टाईम टॅक्स लावला जातो. परंतू देशभरात भाडे तत्वावर वाहन चालवण्यासाठी ऑल इंडिया परमिट प्रादेशीक कार्यालयाकडून घ्यावे लागते. बीड जिल्ह्यात हजारो वाहने खाजगी वापरण्यासाठी नोंदणी केल्यानंतर याचा वापर सर्रासपणे टॅक्सी म्हणून करण्यात येत आहे. याकडे प्रादेशीक परिवहन अधिकार्यांचे दुर्लक्ष असून प्रशासनाचे यामुळे लाखोंचे नुकसान होत आहे.
बीड जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने चार चाकी वाहने चालतात. शहरातही हजारोच्या संख्येने चारचाकी वाहनांची नोंदणी प्रादेशीक कार्यालयात केली गेली आहे. खाजगी वापरण्यासाठी घेण्यात येणार्या चारचाकी वाहनांची सर्रासपणे टॅक्सी म्हणून वापर होतांना दिसत आहे. याकडे आरटीओ कार्यालयाने कानडोळा केला असल्याने प्रशासनाचे लाखो रूपये पाण्यात जात आहे. खाजगी वाहनासाठी एकदाच टॅक्स भरला जातो. परंतू टॅक्सी परमिटसाठी दरवर्षी नुतनीकरण करणे आवश्यक असते. दरवर्षीच्या टॅक्स न भरण्यासाठी वाहनधारक खाजगी वाहन चालवण्याचा परवाना प्रादेशीक कार्यालयातून घेतात. परंतू याचा वापर मात्र भारतात कुठेही टॅक्सी म्हणून फिरण्यास करतात. परवाना खाजगी परंतू टॅक्सी परमिट नुसार वाहने चालवल्याने महाराष्ट्र प्रादेशीक परिवहन कार्यालयाचा लाखोंचा टॅक्स पाण्यात जात आहे. याकडे बीड आरटीओंनी लक्ष देण्याची आवश्यकता असून विविध कारणाने वाहने तपासणी करत असतांना खाजगी परवाना धारक टॅक्सी परमिट परवाने नुसार वाहने चालवतात. याकडेही आरटीओंनी लक्ष द्यावे.
Add new comment