आघाडीच्या अपात्र नगरसेविका अर्शिया बेगम सईद चाऊस यांच्या डीएनए चाचणीचे आदेश
बीड दि.04 (प्रतिनिधी)ः- उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक प्रक्रियेत दोनच अपत्य असल्याची खोटी माहिती देऊन तीसर्या अपत्याला नाकारणार्या आघाडीच्या नगरसेविका अर्शिया बेगम सईद चाऊस यांची डीएनए चाचणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश मा.घुगे यांनी दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे आघाडीला पुन्हा एकदा चांगली चपराक बसली आहे.
बीड नगरपालिकेच्या निवडणूकीत अर्शिया बेगम सईद चाऊस यांनी तिसरे अपत्य असल्याचे झाकून ठेवले.अर्शिया बेगम सईद चाऊस यांच्या विरोधात फरीदा बेगम अफसर ऊर्फ अय्यूब खान यांनी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. तत्पुर्वी अर्शीया बेगम सईद चाऊस यांनी मंत्रालयात अपिल दाखल करून अपात्रतेला स्थगिती मिळवली होती. अपात्रतेच्या विरोधात त्यांनी पुन्हा मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात रीट याचिका दाखल केली होती. त्यामध्ये मा.घुगे यांच्या खंडपीठाने दि.12/02/2018 पर्यंत अर्शिया बेगम सईद चाऊस व त्यांचे पती यांना तिसरे अपत्य त्यांचेच आहे किंवा नाही असे शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले. पुढे तिसरे अपत्य त्यांचे नसेल तर त्या अपत्याची व दोघा पती पत्नीची डीएनए टेस्ट करावी. त्यात दोषी अाढळल्यास 5 लाख रूपये दंड व दोघांवरही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राज्यात अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकरणात तिसरे अपत्य असणार्यांवर कारवाई होऊ शकते. हे प्रकरण अर्शिया बेगम सईद चाऊस यांना केवळ पोरकटपणा आणि लुंग्यासुंग्याच्या मार्गदर्शनामुळेच अंगलट आले आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे आता आघाडीच्या अपात्र नगरसेविका चांगल्याच अडचणीत सापडल्या असून अपत्य नाकारले तर डीएनए टेस्टला सामोरे जावे लागते आणि स्विकारले तर अपात्रतेची कारवाई होते अशी त्यांची अवस्था झाल्याने चांगलीच फसगत झाली आहे. याबाबत शहरभर उलटसुलट चर्चा सुरू आहे. या प्रकरणात अॅड.जी.के.नाईक थिगळे आणि अॅड.सय्यद शाहेद यांनी फरीदा बेगम अफसर उर्फ अय्यूब खान यांची बाजू मांडली होती.
Add new comment