Add new comment

बीडच्या भूमीपुत्राचा कोल्हापुरात सन्मान- सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते राहुल दुबाले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

बीड : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन गृह विभाग समन्वय समिती सदस्य तथा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संथापक अध्यक्ष राहुल दुबाले यांचा कोल्हापूर येथे आजोजित कार्यक्रमात सिंधुताई सपकाळ, सिने अभिनेत्री मेधा लेवनकार यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्र पत्रकार संघ व महा न्यूज लाईव यांच्या संयुक्त विद्यामाने हा पुरस्कार देण्यात आला. बीड चे भूमिपुत्र राहुल दुबाले यांनी बीड सारख्या ग्रामिण भागात राहून 24 तास रस्त्यावर उतरनाऱ्या पोलिसांचे आणि त्यांच्या कुटुंबीयाचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना स्थापन केली. केवळ संघटना स्थापन करून ते थांबले नाहीत तर त्यांनी संघटनेच्या माध्यमातून पोलिसांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विविध प्रश्नाला वाचा फोडली. याची दखल घेऊन महाराष्ट्र पत्रकार संघ व न्युज लाईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात सिंधु ताई सपकाळ व सिने अभिनेत्री मेधा वेलनकार यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस बोईज संघटनेचे संथापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन ग्रह विभाग समन्वय समीती सदस्य राहुल दुबाले यांचा सन्मान करण्यात आला

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.