स्वत:च्या दोन मुलींवर अत्याचार करणार्‍या बापाला दहा वर्षाची शिक्षा

बीड (प्रतिनिधी) स्वत:च्या दोन मुलींवर अत्याचार करणार्‍या नराधम बापाला न्यायालयाने दहा वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. बीड जिल्हा न्यायालयातील न्या.बी.व्ही.वाघ यांनी या प्रकरणात एकूण बाराजणांची साक्ष नोंदवत हा निर्णय दिला आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी येथील एका नराधम पित्याने स्वत:च्याच दहा वर्षीय आणि सहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना सन २०१४ मध्ये घडली होती. याप्रकरणात आईने दिलेल्या तक्रारीवरून पित्याविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोनि दिनेश आहेर यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. बीड जिल्हा न्यायालयात न्या.बी.व्ही.वाघ यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत एकूण बारा जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. न्या.बी.व्ही.वाघ यांनी बारा जणांच्या साक्षी, सरकार पक्षाच्या वकिलांचा युक्तीवाद यावरून नराधम पित्याला दहा वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकिल ऍड.अजय राख यांनी काम पाहिले.
 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.