लाइव न्यूज़
उर्दू शाळेवरील मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापकाची पदस्थाना रद्द होईना
Beed Citizen | Updated: February 8, 2018 - 3:33pm
विभागीय आयुक्तांच्या चौकशी आदेशाला केराची टोपली; उद्यापासून उपोषणाचा ईशारा
बीड (प्रतिनिधी) शहरातील गांधीनगर भागातील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेवर मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापकाची दिलेली पदस्थाना अद्यापपर्यंत रद्द झालेली नाही. यासंदर्भात त्या भागातील नगरसेविकेसह अन्य नागरीकांनी थेट विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. विभागीय आयुक्त कार्यालयाने दि.२३ जानेवारी २०१८ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना चौकशीचे आदेश देवूनही अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे उद्या दि.९ फेब्रुवारी पासून जिल्हा परिषदेसमोर उपोषणाचा ईशारा पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
बीड शहरातील गांधी नगर भागात जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेवर मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापकाची पदस्थापना देण्यात आलेली आहे. याप्रश्नी नगरसेविका श्रीमती रूक्साना बेगम जकीयोद्दीन यांच्यासह अन्य नागरीकांनी निवेदन देवून त्यांची पदस्थाना रद्द करण्याची मागणी केली होती. सदरील पदस्थाना ही आरटीआयच्या नियमाविरूध्द असून याप्रश्नी विभागीय आयुक्त कार्यालयाने दि.२३ जानेवारी २०१८ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना पत्र पाठवून या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून नियमाप्रमाणे कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. सदरील आदेश देवून पंधरा दिवसांचा कालावधी उलटला तरीही या प्रकरणात कोणतीच कार्यवाही झाली नसून संबंधीत मराठी माध्यमांच्या मुख्याध्यापकाची पदस्थाना रद्द करावी या मागणीसाठी उद्यापासून जिल्हा परिषदसमोर उपोषण करण्याचा इशारा नगरसेविका रूक्साना बेगम जकीयोद्दीन, मुजीब शेख, अन्वर पाशा, सय्यद आलीम, इम्तेयाज भाई, एकबाल शेख व इतरांनी दिला आहे.
Add new comment