Add new comment

वरिष्ठ क्रिकेट संघाची मंगळवारी निवड चाचणी

बीड / वार्ताहर
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ खेळाडूंची क्रिकेट स्पर्धेसाठी १३ फेब्रुवारी मंगळवारी निवड केली जाणार आहे. ही निवड प्रक्रिया बीड जिल्हा क्रिकेट संघाची असणार आहे, अशी माहिती बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर व सचिव आमेर सलीम यांनी दिली.

फेब्रुवारीच्या च्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणाऱ्या वरिष्ठ खेळाडूंच्या स्पर्धेकरिता बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने संघ निवडीसाठी निवड समितीचे गठन करण्यात आले आहे. या निवड समितीमध्ये महेश वाघमारे, राजन साळवी, इरफान कुरेशी, सय्यद शाकेर, मनोज जोगदंड, प्रा. जावेद पाशा, रिजवान खान यांचा समावेश आहे. निवड चाचणीला येणाऱ्या सर्व खेळाडूंनी प्रवेश शुल्क म्हणून दोनशे रुपये व चार पासपोर्ट साईज फोटो, स्वतःचे किट घेऊन मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर हजर राहावे. निवड चाचणीत निवड झालेल्या खेळाडूंमध्ये ३ सराव सामने खेळवण्यात येणार असून या सामन्यांमधील खेळाडूंची कामगिरी पाहून जिल्हा क्रिकेट संघ निवडण्यात येईल, असेही जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने कळवण्यात आले आहे. या निवड चाचणीसाठी खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असेही आवाहन असोसिएशनच्यावतीने करण्यात आले आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.