सिरिया देशात होणारा नरसहार बंद करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्य सरकारला निवेदन

बीड,(प्रतिनिधी):- सिरया या देशामध्ये वस्त्यांमध्ये बॉम्ब टाकून क्रुरपणे निर्देष लोकांना ठार मारले जात आहेत. यात लहान मुलांनाही टार्गेट करून त्यांना ठार मारले जात आहे. अतिशय क्रुरपणे हा सर्व प्रकार होत असून अनेक नागरिकांची घरे उध्दवस्त झाली आहेत. महिलांवर देखील मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले जात असून धर्मस्थळे उध्दवस्त केले जात आहे. सिरया या देशामधील परिस्थिती अंत्यत चिंताजनक बनली असून सिरयामध्ये होणारे नरसंहार बंद करण्यासाठी भारत देशाने पुढाकार घेवून संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आवाज उठवावा असे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सरकारला शिष्टमंडळाने दिले आहे.
सिरिया या देशात मोठ्या प्रमाणावर नरसंहार सुरू असून महिला, लहान मुले आणि नागरिकांना ठार मारले जात असल्याचा प्रकार घडत आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय आणि क्रुर असून सिरियामध्ये होणारा हल्ला थांबवण्यात यावा यासाठी भारत सरकारने संयुक्त राष्ट्र संघामध्ये आवाज उठवून नरसंहार बंद करण्यासाठी पाऊले उचलावी असे शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अनेक निष्पाप नागरिकांचे या हल्लामध्ये प्राण जात असून भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री यांनी याची दखल घेवून सिरिया देशामध्ये होत असलेला अत्याचार थांबवण्यासाठी पाऊले उचलावीत आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांना मदत करावी असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर मौलाना जाकेर साहब, ऍड.शेख शफीक, खुर्शीद आलम, मोईनोद्दीन मास्टर, फारूख पटेल, शेख शकीलभाई, ए.वन.टेलर, खलील खान, खदीर जवारीवाले, युनुसभाई आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.