लाइव न्यूज़
Add new comment
अपघातात विद्यार्थीनी ठार
Beed Citizen | Updated: March 1, 2018 - 4:01pm
बीड (प्रतिनिधी) येवलवाडीत ता.पाटोदा येथे बारावीची परिक्षा देण्यासाठी भावासोबत मोटारसायकलवर निघालेल्या एका विद्यार्थीनीचा रस्त्यातील खड्यामुळे अपघात झाल्यामुळे दु:खद निधन झाले आहे.
येवलवाडी ता.पाटोदा येथील मुमताज बबन पठाण (वय १९) ही विद्यार्थीनी बारावीचा पेपर देण्यासाठी रायमोहा येथील परिक्षाकेंद्रावर भावासोबत मोटारसायकलवर जात असतांना रस्त्यामधील खड्यामुळे दुचाकीचा अपघात होत गंभीर जखमी झाली होती. तिला तात्काळ बीड येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले असता सायंकाळी तिची प्राणज्योत मालवली. मुमताज ही अभ्यासात हुशार असून तिचे आईवडिल नगर येथे ऊसतोड मजुर म्हणून काम करतात. सदरिल घटना घडताच आई वडिलांनी रूग्णालयाकडे धाव घेतली. आज सकाळी मुमताज हिचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेने येवलवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
