लाइव न्यूज़
सत्तेची नशा; महिलेवरच अत्याचार?
Beed Citizen | Updated: March 3, 2018 - 3:07pm
पिडित महिला चार दिवसांपासून एसपी ऑफिसचे उंबरटे झिजवतेय; गुंतागुंत वाढल्याने अधिकारीही हतबल; औरंगाबादहून आयजींना पाचारण
बीड, (प्रतिनिधी)ः- एका ४० वर्षीय महिलेवर जबरदस्तीने आत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पिडीत महिलेने स्थानिक पोलिसांकडे दाद मागुनही कोणतीच दखल घेतली जात नसल्याने संबंधित महिला चार दिवसांपासून पोलिस अधिक्षक कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. मात्र, तिथे ही पिडीतेची दखल घेणारा कोणी नसून न्याय मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणात एका मात्तबर लोक प्रतिनिधीचा समावेश असल्याने प्रचंड गुप्तता पाळली जात आहे. सत्तेच्या मस्तीमुळे संबंधित पांढरपेशा व्यक्ती विरूध्द कारवाई करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी आवश्यक असल्याने पोलिस अधिक्षकांनी या प्रकरणात विशेष महानिरिक्षकांना पाचारण केल्याचे वृत्त आहे. त्याच प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आयजी बीडमध्ये दाखल झाले असून दुपारी उशीरापर्यंत पोलिस अधिक्षकांसह व अन्य अधिकार्यांशी त्यांची चर्चा सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.
बीड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सत्तेची नशा चढलेला एका पांढरपेश्या नेत्यानेच ४० वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. संबंधीत पिडितेने स्थानिक पोलिसांकडे दाद मागूनही त्याची दखल न घेतल्याने पिडितीने पोलिस अधिक्षक कार्यालयाचे दार ठोठावले आहे. याप्रकरणात एका मोठ्या नेत्याचा समावेश असल्याने त्याच्याविरूध्द कारवाई करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी आवश्यक असल्याने पोलिस अधिक्षकांनी विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून मार्गदर्शन मागविले होते. प्रकरणाचे गांभिर्य पाहता विशेष पोलिस महानिरीक्षक भारंबे हे आज दुपारी बीडमध्ये दाखल झाले असून उशिरापर्यंत त्यांची पोलिस अधिक्षकांसमवेत चर्चा सुरू होती. याप्रकरणाशी संबंधीत पिडित महिलाही त्यावेळी उपस्थितीत होती अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. महिला अत्याचार प्रकरणाने आष्टी, पाटोदा, शिरूर परिसरात खळबळ उडाली असून ‘तो’ नेता कोण? याविषयी तर्क-वितर्क लावले जात आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक याप्रकरणात काय भुमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान एका सत्ताधारी व्यक्तीकडूनच असे कृत्य घडल्याने संताप व्यक्त होत असून याप्रकरणी वरिष्ठ स्तरावरील विरोधकही आक्रमक झाल्याचे समजते.
Add new comment