Add new comment

खोर्‍याचा दांडा डोक्यात घातला

बीड, (प्रतिनिधी)ः- शहरातील माळीवेस भागातील यादव यांचा मळा बारा दरी येथे  शिवीगाळ करत लाथा बुक्कयाने आणि खोर्‍याच्या दांड्याने मारहाण करीत जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील बारा दरी येथील ज्ञानेश्‍वर भिडवे वय २२ वर्षें रा.यादवांचा मळा यांना विनाकारण शिवीगाळ करत फावड्याच्या दांड्याने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी अक्षय जाधव वय २२ वर्षे, दिनेश राजु भिसे वय २४ वर्षें यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात कलम २९४, ३२४, ३२३, ५०४, ५०६ भादंवि प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास स.पो. चक्रे हे करीत आहेत.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.