लाइव न्यूज़
Add new comment
बीडमध्ये अनोख्या पद्धतीने होळी
Beed Citizen | Updated: March 1, 2018 - 4:32pm
बीड (प्रतिनिधी) होळी केवळ कौटुंबिक सण न ठेवता बीडमध्ये सर्व पक्ष आणि संघटनेतील सदस्यांनी एकत्र येऊन आज अनोख्या पद्धतीने होळी साजरी केली. जातीयवादाच्या विचारांची होळी करून आम्ही सर्व एकत्र चा नारा देणारी ही अनोखी होळी येथील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स जवळ करण्यात आली. यावेळी भाजपचे जि.प.सभापती संतोष हांगे, जि.प.सदस्य संदीप क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, जगदीश गुरखूदे, स्वप्नील गलधर, सलीम जहांगीर, ऍड. शफीक शेख, भगीरथ बियाणी, पत्रकार महेश वाघमारे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
