Add new comment

गाडगेबाबांचा वसा हाती घेणाऱ्या योगीता गवळीचे काम कौतुकास्पद-सुभाष धस

आष्टी (प्रतिनिधी) : शिरूर येथे भाजपाच्या बुथप्रमुख प्रशिक्षण शिबीरामधे स्वच्छतादुत कु.योगिता आजीनाथ गवळीचा कमलरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपा अल्पसंख्याकचे प्रदेश उपाध्यक्ष यांनी सत्कार शुभेच्छा देवून म्हणाले की योगिताने शिक्षण चालुअसतांना स्वच्छतेसाठी काम करून संत गाडगेबाबांचा वसा हाती घेतला असून तिचे काम खूप कौतुकास्पद आहे असे सांगितले.
              शिरूर येथे यशवंतराव होळकर विद्यालयामधे भाजपाच्या बुथप्रमुख प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी स्वच्छ भारत मिशनसाठी काम करणारी व बीड जिल्हा परिषदेची स्वच्छतादुत कु.योगिता आजीनाथ गवळी हिला नुकताच "कमलरत्न पुरस्कार" पुरस्कार जाहीर झाला असून त्याबद्दल तिचा शिरूर भाजपाच्या वतीने भाजपा अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष धस व मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी योगिताचे कौतुक करतांना धस म्हणाले की योगिताने कमी वयात आणि शिक्षण घेत घेत स्वच्छतेसाठी जे काम हाती घेतले आहे ते खूपच कौतुकास्पद असून संत गाडगेबाबांचा वसा हाती घेतला आहे असे सांगितले.
           यावेळी सुभाष धस,मुख्यमंत्रीवार रूमचे दत्ता कदम,विधानसभा विस्ताराक प्रविनजी पवार,ता.अध्यक्ष डॉ.मधुसुदन खेडकर,जि.प.रामदास बडे,भाजपाचे जेष्ठ नेते आश्रुबा खरमाटे मामा,यूवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मयूरीताई खेडकर,भाजपा अल्पसंख्याक सेलचे ता.अध्यक्ष फय्याज शेख,श्रीम.वैशालीताई गवळी,ता सरचिटणीस इंजि एम एन बडे,शहर अध्यक्ष संदीप गाडेकर,नगरसेवक बाजीराव सानप,सरपंच आभिमान जरांगे,सरपंच देवा गर्कळ,सरपंच माऊली नागरगाजे,सरपंच विष्णु नितळ,सरपंच विठ्ठल बडे,उपसरपंच संजय शिरसाट,सावळेराम जायभाये,मधुकर जायभाये,तबाजी इंगळे,अर्जुन तिळकर,कालीदास आघाव,बंडू कराड,शिवाजी जायभाये,मारूती वीर,अमर माळी,प्रकाश पालवे,सोमनाथ जायभाये यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.