Add new comment

शहेंशाहवली दर्गाहच्या इनामी जमिनीचे सर्रासपणे हस्तांतरण बेकायदेशिर हस्तांतरण थांबवा-महंमद जियाओद्दीन

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील हजरत शहेंशाहवली दर्गाहच्या इनामी जमिनीचे सर्रासपणे हस्तांतरण करुन त्याची विक्री करण्याचे प्रकार सुरु आहेत. जमिनीच्या बाजूने चौपदरी रस्ता जात असल्याचा फायदा घेत तेथील इनामी जमिनीची विक्री केली जात  असुन सदरील जमिनीचे बेकायदेशिर हस्तांतरण थांबवा अशी मागणी दर्गाहच्या इनामदार महंमद जियाओद्दीन जहूरोद्दीन यांनी जिल्हा वक्फ अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे
बीड शहरातील हजरत शहेंशाहवली दर्गाहची सेवा इनाम जमीन सर्व्हे नं.२२, २३, ३१, ३२, ९५ तर्फे पिंगळे या भागात आहे. सदरील जमिनीमधुन व बाजूने चौपदरी रस्ता गेल्यामुळे जमिनीचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्याचा फायदा घेत काही इनामदार त्या इनामी जमिनीची सर्रास विक्री करु लागले आहेत. इनामी जमीन विक्री किंवा हस्तांतरीत करता येत नसतांनाही जिल्हा वक्फ अधिकार्‍यांना अंधारात ठेवून काही भुमाफियांनी सदरील जमिनी विक्री करण्याचा आणि त्याचे हस्तांतरण करण्याचा घाट घातला आहे. या संदर्भात अधिकार्‍यांनी लक्ष देवून बेकायदेशिर हस्तांतरण थांबवावे अशी मागणी महंमद जियाओद्दीन यांनी केली आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.