Add new comment

बीड येथील डॉ. सानप यांच्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या ; जितुंर येथे दवाखान्यातील खोलीतच ओढणीने घेतला गळफास

बीड (प्रतिनीधी) परभणी जिल्ह्यतील जिंतुर येथे खैर प्लॉट भागात राहणाऱ्या एका डॉक्टर महिलेने आपल्या दवाखान्यातील खोलीत पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. डॉ. मीरा सानप (३२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

डॉ. मीरा सानप (३२) यांच लग्न २००६ या वर्षी बीड येथील डॉ. गणेश सानप यांच्या सोबत झाले. गेल्या काही वर्षापासून वैद्यकीय व्यवसायानिमित्त हे दांपत्य शहरात राहत होते. शहरातील खैरी प्लॉट भागात गेल्या चार ते पाच वर्षांपासून दाताचे डॉक्टर गणेश सानप व डॉक्टर मीरा सानप हे दाम्पत्य राहते. त्यांनी आपल्या दवाखान्यातील एक खोली आरामासाठी ठेवलेली आहे. सोमवारी डॉक्टर मीरा सानप यांनी दिवसभर नेहमीप्रमाणे दातांच्या उपचारार्थ दवाखान्यात आलेल्या रुग्णांवर उपचार करुन सायंकाळी त्या दवाखान्यातच आराम करण्यासाठी खोलीत गेल्या त्याच ठिकाणी त्यांनी गळ्यातील ओढणीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ठ आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.