Add new comment

खांडेंच्या नेतृत्वाखाली ’शिवसेना आपल्या दारी’ अभियानास शेतकर्‍यांकडून प्रचंड प्रतिसाद

माळापुरी, घोसापुरी, कुर्ला, पेंडगावात शेतकर्‍यांच्या दारोदार पोहोचली शिवसेना
बीड(प्रतिनिधी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाभरात कर्जमाफीच्या सत्यतेची पडताळणी अर्ज भरून घेत शिवसेना थेट शेतकर्‍यांच्या दारोदार जात आहे. शिवसेना आपल्या दारी अभियानात आज जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वाखाली माळापुरी, घोसापुरी, पेंडगाव कुर्ला येथे दारोदार जात शेतकर्‍यांशी संवाद साधला. या अभियानास पहील्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या असून शेतकर्‍यांनी स्वतःहुन पुढे येत अर्ज भरून दिले आहेत. 
   शिवसेना आपल्या दारी अभियानास आजपासून सुरूवात झाली आहे. बीड तालुक्यातील माळापुरी, घोसापुरी, कुर्ला, पेंडगाव येथे या अभियानात शिवसैनिकांनी शेतकर्‍यांशी दारोदार जात संवाद साधला. शिवसेनेच्या या अभियानास शेतकर्‍यांनी प्रचंड प्रतिसाद मिळत असून शेतकर्यांनी कर्जमाफी, हमीभाव व भाजपाकडुन शेतकर्‍यांच्या होत असलेल्या कुचंबनेची जिल्हाप्रमुखाकडे वाचा फोडली. या अभियानात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, उपजिल्हाप्रमुख नारायण काशीद, तालुकाप्रमुख उल्हास गिराम, मा.प.स.सदस्य नवनाथ प्रभाळे,  तात्या शेटे,  सरपंच अनिल पाटील, बबन पवार,सखाराम कोरडे, सुरेश गाडे, इतर ठिकठिकाणाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक, ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.