शेतकऱ्याच्या न्यायासाठी आर-पार चा संघर्ष करू - कुंडलिक खांडे

शिवसेना गावागावात अन सैनिक पोहचला शेतकऱ्यांच्या बांधावर
बीड (प्रतिनिधी) शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशावरून, शिवसेना नेते ना. रामदासभाई कदम व संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव इत्यादी विषयांवर थेट शेतकऱ्यांच्या दारोदार जाऊन विचारपुस करणाऱ्या शिवसेना आपल्या दारी अभियानात आज बीड तालुक्यातील पिंपरगव्हाण, तिप्पटवाडी, या गावातील शेतकऱ्यांशी शिवसैनिकांनी संवाद साधला. भाजपा सरकारने कर्जमाफीची नुसती जाहीरातबाजी करून  शेतकऱ्यांना फसवण्याचेच काम केले असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी शिवसेनेला सांगितले. या अभियानांतर्गत शिवसेना गावागावात अन् शिवसैनिक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली आहे. शेतकऱ्यांच्या न्यासासाठी आरपारचा संघर्ष उभा करणार असल्याचे कुंडलिक खांडे यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.
    शिवसेना आपल्या दारी अभियानांतर्गत शिवसेनेने शेतकऱ्यांच्या थेट दारात जाऊन विविध प्रश्नांवर चर्चा करत अर्ज भरून घेतले आहेत. या चर्चेदरम्यान शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची सत्यता समोर येत असून लाखोंची उधळण जाहीरातबाजीवर अन् कर्जमाफी तर नावालाच असल्याची जळजळीत प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून मिळताना दिसून येत आहे. शिवसेना कर्जमाफीच्या सत्यतेची पडताळणी करत असल्याबद्दल अन् शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत असल्याबद्दल शेतकऱ्यांकडून आभार व्यक्त केले जात आहे. आजपरिस्थितीला कर्जमाफीचे कागदी घोडे नाचवून भाजपा जनतेची अन् शेतकऱ्यांची दिशाभुल करण्याचे काम करत असल्याचे यावेळी येथील शेतकऱ्यांनी शिवसैनिकांना सांगितले. जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह उपजिल्हाप्रमुख नारायण काशीद, तालुकाप्रमुख उल्हास गिराम, प्रा शिवराज बांगर, रमेश उंदरे, पिंपरगव्हाण येथील अशोक आगाम, बबन दिवटे, नारायण कांबळे, सुभाष चित्रे, परशुराम आगाम, चित्रे भिमराव, आत्माराम आगाम, तिप्पटवाडी येथील हनुमान शेंडगे, अमृत शेंडगे, निवृत्ती शेंडगे, रामकिसन शेंडगे, तिपटे अमोल, अरूण शेंडगे, दादासाहेब शेंडगे, तिपटे कृष्ण, एकाळ हनुमान इत्यादींसह ठिकठिकाणचे शेतकरी, आजीमाजी पक्षपदाधिकारी, शिवसैनिक, युवक, महीला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने अभियानावेळी उपस्थित होते.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.