लाइव न्यूज़
बीड जिल्ह्यातील मुकादमांचे नाशिक येथे कारखान्याविरोधात उपोषण
बीड, (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि गेवराई येथील मुकादमांचे सन २०१५-१६ या वर्षाचे कमिशन, डिपॉझिट, ऊसतोडणी वाहतुक डिपॉझिट देण्यात यावे या मागणीसाठी वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना, विठेवाडी ता.देवळा जि.नाशिक येथे मुकादमांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. बीड जिल्ह्यातील मुकादमांचा या आंदोलनात सहभाग आहे.
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याने बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि गेवराई येथील मुकादमांचे सन २०१५-१६ या वर्षाचे थकीत बाकी रक्कम न दिल्याने कारखान्याच्या या भुमिकेविरोधात मुकादमांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणामध्ये राहूल बाबुराव राठोड, रोहीदास पवार, विनायक राठोड, सुभाष राठोड, गंगाधर राठोड, बळीराम राठोड, प्रभाकर पवार, अनिल राठोड,लक्ष्मण राठोड यांचे ११ लाख २३ हजार ६२५ थकबाकी आहेत. यासह टोळीभाडे २ लाख २५ हजार बाकी आहे. ते त्वरीत वाटप करावे या मागणीसाठी उपोषण सुरु आहे. या उपोषणामध्ये मोहन जाधव, आसाराण राठोड, अशोक लहाने, शिवाजी जाधव, यांच्यासह मुकादमांचा सहभाग आहे.
Add new comment