लाइव न्यूज़
बीड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उद्या 'दंगल' ! महिला दिनानिमित्त सीईओ येडगे यांचे आदेश
बीड ( प्रतिनिधी ) जागतीक महिला दिनानिमित्त उद्या दि. 8 मार्च रोजी दुपारी 12. 30 नंतर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना दंगल चित्रपट दाखविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. यासंदर्भात प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठवून याबाबत अंमलबजावणी करून त्याचा अहवाल पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी महिला दिनानिमित्त अनोखा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधून ' दंगल ' चित्रपट दाखवण्याचे आदेश त्यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यानुसार शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना पत्र पाठवून उद्या दि. 8 मार्च रोजी दुपारी 12. 30 नंतर सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये दंगल चित्रपट दाखवून त्याचा अहवाल पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. दंगल चित्रपटातून कुस्ती खेळाविषयी त्यातील मुलींनी दाखविलेला विश्वास आणि एखादे लक्ष्य गाठण्यासाठी केलेले परिश्रम त्या चित्रपटातून अधोरेखित होतात. मुलगी असूनही स्वतःला कमी न समजता कुस्तीचे मैदान गाजवणाऱ्या गीताची कथा सर्वांना माहीत व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवल्याचे दिसून येते.
Add new comment