शिवजन्मोत्सव उत्साहात! जय जिजाऊ...जय शिवराय...जयघोषाने बीड शहरात भगवे वादळ

बीड (प्रतिनिधी) बीडमध्ये सोमवार दि.१९ फेब्रुवारी २०१८ रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव भव्य-दिव्य ऐतिहासिक साजरा केला जाणार आहे. कोणाकडूनही वर्गणी न घेता किंवा डीजेचे ध्वनी प्रदुषण न करता कसलाही धांगड-धिंगा न होऊ देता, अतिशय शिस्तीत आणि शांततेत सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्याचा निश्‍चय उत्सव समितीने केलेला आहे. संपूर्ण भारतभर अत्यंत लोकप्रिय असलेले सिक्कीम, केरळ आणि गोवा येथील कलावंतांचे डोळ्यांचे पारणे फेडणारे कलाप्रकार शिवजयंतीचे मुख्य आकर्षण ठरणार असून महाराष्ट्रातील सांस्कृतिक श्रीमंती दर्शविणारे कलाप्रकार व ४०० पेक्षा अधिक कलावंतांचे झांज, ढोलपथक इत्यादींच्या माध्यमातून बीडमधील आगळा-वेगळा शिवजयंतीचा उत्सव शिवप्रेमींना पर्वणी ठरणार आहे. या शिवजयंती सोहळ्यास सर्व नागरीकांनी, शिवप्रेमींनी सहकुटूंब-सहपरिवार सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादीचे युवानेते तथा जि.प.सदस्य संदीपभैय्या क्षीरसागर आणि शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. विजय पवार यांनी पत्रकार परिषदेतुन केले आहे.
बीड शहरात यंदा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे हे ५१ वे वर्ष असून हा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय या वर्षीच्या उत्सव समितीने घेतलेला आहे. संदीपभैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाते. महाराष्ट्रभर ख्यातकिर्ती झालेल्या शिवजयंती उत्सवाची परंपरा याही वर्षी पाळण्यात येत असून बीडमधील शिवजयंतीचा झेंडा आटकेवार फडकू लागला आहे. या निमित्ताने बीडकरांना बाहेर राज्यातील तसेच कोल्हापूर, पुणे येथील झांज व ढोलपथकांचा अप्रतिम कलाविष्कार पहावयास मिळणार आहे. महिला आणि मुलींसाठी सुभाष रोडवरील एनके सिलेक्शन व मराठवाडा टेक्सटाईल जवळ विशेष बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांना अत्यंत सुरक्षित वातावरणात या सांस्कृतिक कलांचा आस्वाद घेता येईल. मिरवणूकीच्या सुरुवातीला स्त्रीशक्तीचा सन्मान म्हणून उपस्थित महिला भगिनींना फेटे बांधून त्यांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच व्यापारी बांधव, शिक्षण क्षेत्रात काम करणारे व्यक्ती व मान्यवरांचे स्वागतही फेटे बांधून करण्यात येणार आहे. या मिरवणूकीत शहरातील व्यापारी संघटना, सामाजिक प्रतिष्ठान, कोचिंग क्लासेस असोसिएशन आणि विविध संघटनांचा सक्रिय सहभाग असणार आहे. बीड शहरातील युवकांनी आपल्या शिस्तीचे प्रदर्शन करुन सहकुटूंब, सहपरिवार शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन संदीपभैय्या क्षीरसागर, अध्यक्ष प्रा. विजय पवार, सचिव सुरेश नखाते, उपाध्यक्ष फारुक पटेल, दिलीप भोसले, गोपाल लड्डा, प्रा.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, डॉ. तिडके, डॉ.संजय जानवळे, रंजीत डिसले, अविनाश काळे, गोरख शिंदे, ऍड.हेमंतबप्पा औटे, लईकभाई यांनी केले आहे. या वेळी गतवर्षाचे शिवजयंती अध्यक्ष भरत झांबरे पाटील, माजी सभापती अमर नाईकवाडे, ऍड इरफान बागवान यांची उपस्थिती होती.

 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.