लाइव न्यूज़
बीडमध्ये सराफ-सुवर्णकारांची निदर्शने
बीड (प्रतिनिधी) केज येथील सराफा व्यापारी विकास थोरात यांची हत्या घडवून लुट केल्याच्या निषेधार्थ आज सकाळी जिल्हा कचेरीसमोर सराफ-सुवर्णकार असोसिएशनच्यावतीने निदर्शने करण्यात आली. या प्रकरणाची पुर्ण चौकशी करून विशेष सरकारी वकिल म्हणून ऍड.उज्वल निकम यांची नियुक्ती करावी आणि मयत व्यापार्याच्या कुटूंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली.
बीड येथे आज सकाळी सराफ-सुवर्णकार व्यापारी असोसिएशनच्यावतीने निदर्शने करण्यात आली. केज येथील व्यापारी विकास थोरात यांची हत्या घडवून दागिन्यांची लुट करण्यात आली. यापुर्वीही वारंवार व्यापार्यांवर हल्ले झालेले आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी करावी, विशेष सरकारी वकिल म्हणून ऍड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी आणि व्यापार्याच्या कुटूंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश बेदर,े सचिन मंगेश लोळगे आदिंसह जिल्हाभरातील सराफ व्यापारी उपस्थित होते.
Add new comment