लाइव न्यूज़
संदिप क्षीरसागर आणि विजयसिंहांमुळे शिवजयंतीला लोकोत्सवाचे बळ
बीड (प्रतिनिधी) शिवजयंतीच्या निमित्ताने युवानेते संदिप क्षीरसागर आणि विजयसिंह पंडित यांनी पाडलेला आदर्श पायंडा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात चर्चेचा विषय ठरू लागला आहे. सार्वजनिक कार्यक्रमातून डिजेचा दणदणाट आणि नाचगाण्यांची चंगळ ही पारंपारिक ओळख पुसून काढण्याचा प्रयत्न संदिप आणि विजयसिंहांनी केला. डिजे, वर्गणी अशा भानगडीतून बाहेर पडत या दोघांनीही सामाजिक आणि अस्सल मराठमोळी संस्कृती जपण्याचा केलेला प्रयत्न वाखानण्याजोगा आहे. संदिप क्षीरसागर आणि विजयसिंहांमुळे जिल्ह्यातील शिवजयंतीला लोकोत्सवाचे बळ मिळाले आहे. भविष्यात हाच पॅटर्न राज्यभर पोहोचल्यास त्याचे सर्व श्रेय बीड जिल्ह्यालाच मिळेल. यात तिळमात्र शंका नाही.
संदिप क्षीरसागर आणि विजयसिंह पंडित यांनी शिवजयंती उत्सवाला नवी ओळख मिळवून दिली आहे. संदिप क्षीरसागर यांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून एकात्मतेचे दर्शन घडवत सामाजिक विषमता पेरणार्यांना सणसणीत चपराक लगावली आहे. उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रा.विजय पवार तर उपाध्यक्षपदी फारूक पटेल आणि दिलीप भोसले यांनी संधी देत शिवजयंती कोण्या एका धर्माची नसून सर्व समाज घटकांची असल्याचे दाखवून दिले. मिरवणूकीतूनही उपस्थित महिलांचा सन्मान करत ‘बेटी बचाव बेटी पढाओ’चा संदेश दिला. देशातील विविध राज्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या शेकडो कलावंतांनी चित्तथरारक कसरती करत बीडकरांच्या काळजाचा ठोका चुकविला. शिस्तबध्द मिरवणूक, कोणालाही अडथळा होणार नाही असे नियोजन, स्वत:चा सहभाग आदि माध्यमातून संदिप क्षीरसागर यांनी बीडच्या शिवजयंतीची ओळख राज्यभर केली. दुसरीकडे विजयसिंह पंडितांनी ग्रामीण भागातील लोकांनाही आपल्या आदर्श राजाच्या राज्यकारभाराची माहिती व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य दाखवले. एवढेच नव्हे तर गेवराईत शोभायात्रा काढून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. दोन्ही युवा नेत्यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून दाखवलेला अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचा परिघ राज्यभर पोहोचल्याने संदिप आणि विजयसिंहांच्या शिवजयंती उत्सवाला लोकोत्सवाचे बळ मिळाल्याचे अधोरेखीत झाले.
Add new comment