लाइव न्यूज़
स्वच्छ, सुंदर बीड पहायचंय, तर चला पत्रकार भवनाकडे!
Beed Citizen | Updated: February 18, 2018 - 2:41pm
बीड (प्रतिनिधी) स्वच्छ आणि सुंदर बीडचा संकल्प, दावा नेहमीच केला जातो. प्रत्यक्षात मात्र ठिकठिकाणी कचर्याचे ढिग आणि तुंबलेल्या नाल्यांचे चित्र पहायला मिळते. याचीच प्रचिती नवी भाजीमंडईतील पत्रकार भवनाजवळ येवु लागले आहे. भवनाच्या प्रवेशद्वारावरच मोठी नाली तुंबली असल्याने तेथून जाणेही अवघड होत आहे. शहरभर स्वच्छतेचा डांगोरा पिटणार्या पालिका प्रशासनाला पत्रकार भवनाजवळची नाली दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
बीड पालिकेत सत्ता कोणाची आहे?, पदाधिकारी कोण आहेत? हा मुद्दा महत्वाचा नसुन शहरवासियांच्या दृष्टीने स्वच्छतेचा प्रश्न अधिक महत्वाचा आणि तितकाच गंभीर आहे. स्वच्छ आणि सुंदर शहराचे दावे नेहमीच केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र काय स्थिती आहे? याची प्रचिती बीडच्या नवीभाजीमंडईतील पत्रकार भवनाला भेट दिल्यास दिसून येईल. भवनाच्या प्रवेशद्वारालाच मोठी नाली तुंबलेली असून घाण पाण्याचा डोह साचला आहे. आतमध्ये जाण्यासाठी एक लाकडी फळी टाकण्यात आली असून त्यावरूनच ये-जा केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून हीच स्थिती पहायला मिळत असून शहरभर स्वच्छतेचा डांगोरा पिटणार्या पालिका प्रशासनाला पत्रकार भवनाजवळची तुंबलेली नाली आणि साचलेला डोह का दिसत नाही? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
Add new comment