लाइव न्यूज़
तरूणास मारहाण करून लुटले; पेठ बीड पोलिसात गुन्हा दाखल
Beed Citizen | Updated: February 17, 2018 - 3:00pm
बीड (प्रतिनिधी) शहरातील शहेंशाहवली दर्गा तलावाजवळ एका १७ वर्षीय तरूणास चार ते पाच जणांनी मारहाण केली. मारहाणीनंतर तरूणाजवळील विस हजार रूपये रोख रक्कम घेवून हल्लेखोर फरार झाले. तरूणाच्या फिर्यादीवरून पेठ बीड पोलिस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इस्लामपुरा भागात सय्यद कामरान सय्यद रोफ या तरूणाला तीन ते चार जणांनी खोर्याच्या दांड्याने जबर मारहाण केली. मारहाणीनंतर तरूणाजवळील वीस हजार रूपये रोख रक्कम घेवून हल्लेखोर फरार झाले. जखमी तरूणाला शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सदरिल तरूण हा जालना जिल्ह्यातील आष्टी येथील सरपंच सय्यद अब्दुल रोफ यांचा मुलगा असून दोन महिन्यापूर्वी क्रिकेटच्या खेळामुळे वाद निर्माण झाला होता. याच वादातून हि मारहाण झाल्याचे सांगण्यात येते. हल्लेखोरांविरूध्द पेठ बीड पोलिस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोहेकॉ जाधवर, वाघ हे करत आहेत.
Add new comment