Add new comment

विवाहीत महिलेला तिच्या नवर्‍यानेच पेटवून दिले कोळगाव येथील प्रकार; महिलेची मृत्यूशी झुंज

गेवराई (प्रतिनिधी) येथील कोळगावमध्ये काल दुपारी नवरा-बायकोच्या भांडणामध्ये नवर्‍याने अक्षरश: बायकोच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत महिला १०० टक्के भाजली गेली असून तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. महिलेच्या फिर्यादीवरून तिच्या नवर्‍याविरूध्द तक्रार नोंदवण्यात आल्याचे कळते.
काल भरदूपारी १२ वाजण्याच्या सुमारास कोळगाव येथे जया विपुल जाधव या महिलेला तिचा पती विपुल जाधव याने रागाच्या भरात जयाच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नवरा-बायकोच्या भांडण झाले होते. यातूनच विपुल जाधव याने कुठलाही विचार न करता त्याची पत्नी जयाला पेटवून दिले. या घटनेमध्ये जया जाधव ही १०० टक्के भाजली गेली असुन तिला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जयाच्या फिर्यादीवरून तिचा पती विपुल जाधव विरूध्द जबाब घेण्यात आला असुन पोलिस पुढील तपास करत आहेत.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.