लाइव न्यूज़
बीडमध्ये २५ शेळ्यांची चोरी
Beed Citizen | Updated: February 17, 2018 - 2:52pm
बीड (प्रतिनिधी) शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील बाजुस असलेल्या घराजवळून अज्ञात चोरट्यांनी २५ शेळ्या चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मजुराच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शहरात आधीच चोर्यांचे सत्र वाढले आहे. त्यात आता चोरट्यांनी पशुधनही लक्ष केल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
बीड शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील बाजुस असलेल्या घराजवळून अज्ञात चोरट्यांनी ७५ हजार रूपयांच्या २५ शेळ्या चोरून नेल्या. हा प्रकार दि.१३ रोजी दुपारी घडला असून याप्रकरणी मजुर हिरासिंग नेपालसिंग शिकलकरी (३५) यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि सोनार हे करत आहेत.
Add new comment