लाइव न्यूज़
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कर्मचारी संपावर ग्रामविकास मंत्र्यांचा जिल्हा असूनही चार दिवसांपासून दुर्लक्ष
बीड (प्रतिनिधी) प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचार्यांनी प्रलंबीत मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. जिल्ह्यातील २६ कर्मचारी त्यामध्ये सहभागी झाले असून चार दिवसांपासून संप सुरू असूनही प्रशासन दखल घेत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामविकास मंत्र्याच्या जिल्ह्यातच कर्मचार्यांवर ही वेळ आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
राज्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. प्रलंबीत मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचार्यांनी दि.१५ फेब्रुवारीपासुन बेमुदत संपाची हाक दिलेली आहे. संपाचा आज चौथा दिवस असूनही प्रशासन आंदोलनकर्त्यांची दखल घेत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामविकासाच्या माध्यमातून जिल्ह्यासह राज्यात रस्त्यांचे जाळे विणण्याचे स्वप्न पाहणार्या ग्रामविकास विभागाच्याच कंत्राटी कर्मचार्यांवर चक्क उपोषण करण्याची वेळ येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Add new comment