लाइव न्यूज़
बीडमध्ये खांडे, जगताप तर माजलगावमध्ये मुळूक रस्त्यावर शिवसेनेचे जिल्हाभर ठिय्या आंदोलन; भाजप विरूध्द डागली तोफ
बीड/माजलगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांना तातडीने मदत करा यासह शेतकर्यांच्या अन्य मागण्यांसाठी शिवसेना आक्रमकरित्या रस्त्यावर उतरली. बीडमध्ये आज दुपारी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, अनिल जगताप स्वत: हजारो शिवसैनिकांसह रस्त्यावर उतरले. तर माजलगावमध्ये जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी ठिय्या आंदोलन करत भाजप सरकारला लक्ष्य केले. जिल्हाभरात शिवसैनिकांनी आंदोलन करून शेतकर्यांच्या प्रश्नावर आवाज उठविला.
बीड जिल्ह्यातील रबी पिके आणि फळबागांचे ३३ टक्के क्षेत्र बाधीत झाले आहे. त्यानुसार शेतकर्यांना पूर्ण नुकसान भरपाई द्यावी, वेळेत पंचनामे करून पैसे शेतकर्यांच्या खात्यावर जमा करावेत आदी मागण्यांसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप, उल्हास गिराम, बाळासाहेब पिंगळे, विलास महराज शिंदे, किसान सेना प्रमुख परमेश्वर सातपुते, युवा सेनेचे राहूल फरताडे, गणेश् उगले, शिवराज बांगर, पंकज कुटे आदिंची उपस्थिती होती. माजलगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यासोबत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, आप्पासाहेब जाधव,डॉ.उध्दव नाईकनवरे,शहराध्यक्ष अशोक आळणे,ऍड.दत्ता रांजवण,धनंजय सोळंके,सुनिल खंडागळे,अमोलराव डाके,राजेश जाधव,रामराजे सोळंके,प्रल्हाद सोळंके,दासु पाटील बादाडे,मुंजाबा जाधव,शरद नाईकनवरे,अभय मोहरिर,तिर्थराज पांचाळ,दिगांबर सोळंके,राजेश शहाणे,संदीप माने,भारत काळे,ईश्वर थेटे,युवराज पवार,सय्यद फारुक,मुरली धुमाळ,सचिन दळवी व शिवसैनिक,शेतकरी बांधव व आदींचा ठिय्या आंदोलनात सहभाग होता.
Add new comment