लाइव न्यूज़
ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन
Beed Citizen | Updated: February 16, 2018 - 4:06pm
बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील सर्व प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कर्मचार्यांनी प्रलंबीत मागण्यांची पुर्तता न झाल्यामुळे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून कर्मचारी आक्रमक पावित्र्यात दिसून आले.
ऑगस्ट २०१६ मध्ये रूपशे दिघोरे यांचा गडचिरोली येथे अपघात झाला. उपचाराअंती १७ लाख रूपये खर्च होवून त्यांचा मृत्यू झाला. तसेच धुळे जिल्ह्यातील अभिजीत पाटील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचा देखील कर्तव्यावर असतांना अपघात होवू मृत्यू झाला. या अपघातात शासनाने कुठलीही मदत दिलेली नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लेखणीबंद आंदोलन करण्यात आले होते. दि.२९ ऑगस्ट २०१६ रोजी मुख्य अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यांनी लेखी आश्वासन देवून आंदोलन मागे घेण्यास प्रवृत्त केले. वरिष्ठ अधिकार्यांचा मान ठेवून आम्ही आंदोलन मागे घेतले. मात्र आजपर्यंत एकही मागणीची पुर्तता झाली नाही. आम्ही दिड वर्षापासून मागण्यांबाबत सतत पाठपुरावा करत आहोत. मात्र शासन दरबारी अद्याप कुठलीही दखल घेतली जात नाही. कर्मचार्यांना अत्यंत कमी वेतन मिळत असून सन २०१२ पासून एक रूपयाही पगारवाढ करण्यात आलेली नाही. तसेच कुठल्याही प्रकारची अपघाती विमा लागु करण्यात आला नसून महिला कर्मचार्यांना प्रसुती रजा देखील मिळत नाही. यासर्व गोष्टींचा निषेध करत शासन धोरणाचा कर्मचार्यांनी निषेध नोंदवला. जोपर्यंत ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या मागण्या पूणर् होत नाहीत. तोपर्यंत राज्यातील ७५० कर्मचारी संप सुरूच ठेवणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
Add new comment