लाइव न्यूज़
एमआयएमचे पुन्हा उपोषणास्त्र; मोमीनपुरा, जुना बाजार रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी
बीड (प्रतिनिधी) शहरातील मोमीनपुरा, जुना बाजार येथील रस्त्यांचे रखडलेले काम त्वरीत सुरू करावे या मागणीसाठी एमआयएमने पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. एमआयएमचे पालिका गटनेते शेख अमर, नगरसेवक हाफेज अश्फाक यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी आजपासून पालिकेसमोर ठिय्या मांडला आहे.
बीड नगर पालिकेने शहरात सर्वत्र रस्ता रूंदीकरणाची कामे हाती घेतली आहेत. मात्र गेल्या एक ते दिड वर्षापासून रखडलेल्या अशोक नगर,-मोमीनपुरा आणि जुना बाजार रस्त्याच्या रूंदीकरण कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. या प्रश्नी एमआयएमचे गटनेते अमर शेख यांच्या नेतृत्वाखाली आजपासुन पालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. बार्शी नाका ते मोमीनपुरा मार्गे कुरेशी मोहल्ल्यापर्यंत अपुर्ण रस्ता तात्काळ पुर्ण करावा, जुना बाजार ते बलभिम चौक या रस्त्याचे काम त्वरीत सुरू करावे आणि पालिका इमारतीवर उर्दू व इतर भाषेतील फलक लावण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर शेख अमर, जिल्हाउपाध्यक्ष हाफेज अश्फाक, शहराध्यक्ष मोमीन जुबेर, तालुकाध्यक्ष रफिक नौशाद, हॅरिसन फ्रॉन्सीस रेड्डी, जिल्हा सरचिटणीस अय्युब पठाण, युवक जिल्हाध्यक्ष खय्युम इनामदार, शेख शाकेर, मुन्ना इनामदार, शेख फारूक, रहेमद पठाण, शेख नदीम, मिर्जा बेग आदिंच्या स्वाक्षर्या आहेत.
मुख्याधिकार्यांनीच टेंडर काढले आणि त्यांनीच प्रलंबीत ठेवले
मोमीनपुरा व जुना बाजार रस्ता रूंदीकरणाच्या कामाचे टेंडर करून मुख्याधिकार्यांनी कामाचे आदेश दिलेले आहेत. शासनाने दिलेल्या निधीचा उपयोग करून न घेता सदर काम मुख्याधिकार्यांनीच प्रलंबीत ठेवल्याचा आरोप एमआयएमने निवेदनात केला आहे. त्यामुळे शहरातील जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
पुढाकार घेतलाच आहे तर प्रश्न मार्गी लावा!
बीड शहरातील मोमीनपुरा भागातील रस्ता रूंदीकरणाच्या कामासाठी सर्व प्रथम एमआयएमने पुढाकार घेतला होता. त्यानंतर मात्र या भागाकडे दुर्लक्ष झाल्याने आजही रस्त्याअभावी मोमीनपुर्यातील नागरीकांना, व्यापार्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम सुरू करावे यासाठी एमआयएमने यापुर्वीही आंदोलन केले होते. मात्र अजुनही काम सुरू झाले नाही. आता एमआयएमने पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसल्याने आतातरी रस्त्याचे काम व्हावे अशी अपेक्षा नागरीकांतून व्यक्त होत आहे.
Add new comment