Add new comment

विजय लव्हारे यांचे निधन

बीड (प्रतिनिधी) पत्रकार तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करणारे विजय लव्हारे यांचे आज दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अतिशय मेहनती आणि कतृत्ववान पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. लोकपत्र या दैनिकामध्ये त्यांनी आपल्या लेखणीतून वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पार्थिवावर आज मोंढा भागातील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
विजय लव्हारे यांनी लेखणीच्या जोरावर उत्तुंग भरारी घेतली होती. दै.लोकपत्रमध्ये काम करत असतांना त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली. लेखणीच्या जोरावर त्यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत स्वीय सहाय्यक म्हणून काम केले. विजय लव्हारे हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. आज त्यांचे राहत्या घरी निधन झाले. यामुळे लव्हारे कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लव्हारे कुटूंबियांच्या दु:खात सायं.दै.सिटीझन परिवार सहभागी आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.