कुस्त्यांसाठी कायमचे स्टेडियम उभारणार - आ.जयदत्त क्षीरसागर
बीड (प्रतिनिधी)ः- जिल्हा हा क्रिडा शौकिनांचा आणि खेळाडूंचा आहे. या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रातील खेळाडू तयार होऊन जिल्ह्याचे नावलौकिक करत आहेेत. पहिलवानांसाठी कंकालेश्वर मंदीर परिसरात कुस्ती स्पर्धां करीता कायम स्वरूपी स्टेडियम उभारण्यात येईल असे प्रतिपादन लोकनेते आ.जयदत्त क्षीरसाग यांनी केले आहे.
बीड जिल्हा तालीम संघ व कंकालेश्वर ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्री निमित्त दरवर्षी कुस्त्यांची दंगल ठेवण्यात येते या ठिकाणी बीड जिल्ह्यासह राज्यभरातून पहिलवान दाखल होत असतात. बुधवारी आयोजीत करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धे प्रसंगी आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये महिला पहिलवानांचाही समावेश होता. यावेळी बोलताना आ.जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, दिवसेंदिवस खेळामध्येही स्पर्धा वाढू लागल्या आहेत. इतर खेळांमुळे कुस्ती खेळाकडे दुर्लक्ष होते की काय असे वाटत असतानाच या पारंपारिक खेळात बीड जिल्ह्यातील अनेक पहिलवानांनी आपले नाव कमावले आहे. त्यामुळे या खेळाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. बीड येथे राज्यस्तरीय स्पर्ध ठेवाव्यात यासाठी मंदीर परिसरात कायमचे स्टेडियम उभारण्यासाठी आपण प्रयत्न करू. यावेळी स्वातंत्र्य सैनिक बन्सीधर आण्णा जाधव, अच्युत गायके, कल्याण महाराज गुरव, गोविंद चव्हाण, दिनकर कदम, विलास बडगे, इसाक भाई, विलास बुवा जोशी, सोमा गायकवाड, राणा चव्हाण, योगीराज गुरखुदे, आसाराम गायकवाड, वाघीरे, जलील पठाण, संभाजी गुरव, अन्सार चाऊस, बाळू आवारे, शुभम धूत आदि उपस्थित होते.
Add new comment