डॉ.भारतभूषण यांच्यापासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांची पुन्हा घरवापसी!

बीड (प्रतिनिधी) नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्यापासून दुरावलेल्या काही कार्यकर्त्यांची पुन्हा घरवापसी होणार आहे. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकीत त्यांच्यापासून लांब गेलेले कार्यकर्ते आता पुन्हा डॉ.क्षीरसागर यांच्या गटात सहभागी होणार असुन त्यांच्या वाढदिवशीदिनी अनेकजण त्यांच्यासोबत येण्याची शक्यता आहे.
बीड नगरपालिका निवडणूकी पाठोपाठ झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत डॉ.भारतभूषण क्षीरसागर समर्थक काहीजण वाट चुकले. डॉ.क्षीरसागर यांच्या विरोधात जावून काहींनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहता डॉ.क्षीरसागर यांच्यापासून दुरावलेले अनेक कार्यकर्ते पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. शहरातील इस्लामपुरा सह अन्य भागातील कार्यकर्ते युवा नेत्यांची साथ सोडून पुन्हा डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्यासोबत येण्याच्या विचारात आहेत. शहरात होत असलेली विविध विकास कामे, पालिकेतील सत्ता आणि पुढील राजकीय वाटचालीच्या दृष्टीने काही कार्यकर्ते या निर्णयापर्यंत पोहचल्याचे समजते. शनिवार दि.१७ फेब्रुवारी रोजी डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांचा वाढदिवस आहे. त्याचदिवशी अनेकजण पुन्हा त्यांच्या सोबत येणार आहेत.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.