अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी ; अारोपीस दहा वर्षाची शिक्षा

बीड : वडील घरी आले आहेत, असा बहाणा करून अल्पवयीन पीडितेस तिच्याच घरात नेऊन अत्याचार करणार्‍या कृष्णा शहादेव कारके या नराधमास दहा वर्षे सक्तमजूरीची शिक्षा ठोठावण्यात आली. बीड येथील विशेष सत्र न्यायाधीश तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांनी बुधवारी हे आदेश दिले.

गेवराई तालुक्यातील जातेगावजवळील गावखोर तांडा येथे ६ जुलै २०१७ रोजी ही घटना घडली होती. पीडित मुलगी ही आपल्या आजीजवळ राहत होती. कृष्णाने याचा फायदा घेत तुझे वडील आले आहेत, असा बहाणा करून तिला घरी नेले. तिथे तिच्यावर केला. हा प्रकार पीडितेने आईला सांगितला. त्यांनी तात्काळ तलवाडा पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून कृष्णा कारके विरोधात कलम ३५४ (अ), ४५२, ३७६ (आय) व कलम ४,८,१० बा.लैं.अ.प्र. गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणाची सुनावनी बीड येथील विशेष सत्र न्यायाधीश तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांच्या न्यायालयात झाली. गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडिता, तिची आई आणि वैद्यकीय पुरावा शिक्षा देण्यासाठी भक्कम ठरले.

अति.सरकारी वकील अ‍ॅड.भागवत एस.राख यांनी या प्रकरणात युक्तीवाद केला. त्याप्रमाणे न्या.प्राची कुलकर्णी यांनी आरोपीस लैंगीक अपराधांपासून बाल संरक्षण अधिनियम, २०१२ चे कलम ४ प्रमाणे १० वर्षे शिक्षा व ५०० रूपये दंड, कलम ८ प्रमाणे ३ वर्षे शिक्षा व ५०० रूपये दंड तसेच १० प्रमाणे ५ वर्षे शिक्षा व ५०० रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अति.सरकारी वकील अ‍ॅड.भागवत एस.राख यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील अजय दि.राख व इतर सहा.सरकारी वकिलांनी सहकार्य केले. तपास सपोनि प्रविणकुमार बांगर यांनी केला. त्यांना पोलीस उपनिरीक्षक गडवे, वडतकर, चव्हाण यांनी सहकार्य केले. आरोपीला जामीन मिळू नये, म्हणून बांगर यांनी प्रयत्न केले होते.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.