Add new comment

शेकोटीमुळे भाजल्याने गर्भवतीचा मृत्यू

बीड (प्रतिनिधी) शेकोटीजवळ उभे असतांना अचानक साडीने पेट घेतल्याने गंभीररित्या भाजलेल्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान बीड जिल्हा रूग्णालयात मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.
बीड येथील जिल्हा रूग्णालयात आश्‍विनी योगेश खडसे (२१ रा.कवडगाव जि.अहमदनगर) या गर्भवती महिलेचा गंभीररित्या भाजल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदरिल महिला प्रसुतीसाठी माहेरी (वाशी जि.उस्मानाबाद) याठिकाणी आली होती. दि.९ फेब्रुवारी रोजी शेकोटीमुळे ती गंभीररित्या भाजली होती. उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.