Add new comment

एमआयएमचे उपोषण एका दिवसातच मागे २० फेब्रुवारीपर्यंत रस्त्याची कामे सुरू करण्याचे आश्‍वासन

बीड (प्रतिनिधी) एमआयएमच्यावतीने मोमीनपुरा आणि जुनबाजार भागातील रस्त्याचे काम सुरू करावे या मागणीसाठी पालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. एका दिवसातच सदरील उपोषण मागे घेण्यात आले असून मुख्याधिकारी डॉ.जावळीकर यांनी २० फेब्रुवारीपर्यंत रस्त्याची कामे सुरू करून अन्य मागण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे लेखी आश्‍वासन दिले आहे.
एमआयएमचे पालिका गटनेते शेख अमर यांच्यासह नगरसेवक हाफेज अश्फाक, खय्युम इनामदार आदिंनी बुधवारपासून नगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. एका दिवसातच सदरिल उपोषण मागे घेण्यात आले असून मुख्याधिकारी डॉ.जावळीकर यांनी उपोषण करतांना लेखी पत्र देत नगराध्यक्षांच्या सुचनेनुसार दि.२० फेब्रुवारीपर्यंत मोमीनपुरा आणि जुना बाजार रस्त्याचे काम सुरू करण्यात येतील व इतरही मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.