Add new comment

शिवसेनेला आमच्या सोबत यायचे असेल तर हायकमांडला भेटावे -पृथ्वीराज चव्हाण

औरंगाबाद – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप साम, दाम, दंड आणि भेदाचा वापर करेल पण शिवसेनेला सोबतच ठेवील, असे मत व्यक्त केले आहे. औरंगाबाद शहरात काँग्रेसच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. सतत पाठिंबा काढण्याची धमकी शिवसेना देते, पण ही फक्त पोकळ धमकी असल्याचही ते म्हणाले.

चव्हाण म्हणाले, की स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा जरी शिवसेना करत असली तरी भाजप साम, दाम, दंड आणि भेदाचा वापर करून शिवसेनेला आपल्यासोबतच ठेवेल. युती जर तुटली आणि शिवसेनेला आघाडीत सामील व्हायचे असेल तर त्यांनी हायकमांडला भेटावे असे मत व्यक्त करतानाच भाजपला हरवायचे असेल तर राज्यात आणि देशातही समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.