Add new comment
एका लॉन्सवर पोलिसांचा छापा ; जुगार खेळणाऱ्या 12 जणांना पकडले
बीड (प्रतिनीधी)
शहरातील बार्शी रोडवरील एका लॉन्स मध्ये रिसेप्शनच्या कार्यक्रमापूर्वी झन्नमन्ना जुगार खेळणाऱ्या 12 जणांना पोलिसांनी पकडले सोमवारी ( दि.29 ) सांयकाळी ५ च्या सुमारास एसपी पथकाने धाड टाकली 12 जन ताब्यात घेतले व जुगाराचे साहित्य मुद्देमाल जप्त केला अाहे.
पोलीस अधीक्षक जी श्रीधर,अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली अाज सांयकाळी ५ वा पथकप्रमुख कैलास लहाने व त्यांच्या टिमने बार्शीरोडवर एका लाॅन्स मध्ये कार्यकृमापूर्वी खेळत असलेल्या झन्नामन्ना जुगारावर धाड टाकली या मध्ये शेख खमर,पठाण सलीम,शेख अफसर,शेख मुजमील,शकील पठाण,शेख नदीम,शेख अासेफ,फिरोज खान,योगेश भागवत ,फेरोज खान, शेख खिजर,शेख साजेद यांना ताब्यात घेतले असुन त्यांच्या कडील ४००९० रुपये नगदी व मो.सा.७५००० रुपये व जुगाराचे साहित्य असे एकुण १,१५,०९० रु माल जप्त केला अाहे व त्याच्या वर शहरठाण्यात कलम १२(अ)मुजुका प्रमाणे दाखल करण्यात अाला तपास पोहे तिडके हे करीत अाहे.
