धर्मसत्ता, राजसत्ता एकत्र आली तरच क्रांती होते- खा.डॉ.प्रितमताई मुंडे
धर्मसत्ता, राजसत्ता एकत्र आली तरच क्रांती होते- खा.डॉ.प्रितमताई मुंडे
बीड. प्रतिनिधी. धर्मसत्ता ही समाजात चांगले विचार, आचार रुजावेत, एकता नांदावी यासाठी फार महत्वाची आहे. तर राजसत्ता ही चांगले विचार आचार असणार्या समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत असली पाहिजे म्हणूनच धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आली तरच प्रगती होते, क्रांती होते असे प्रतिपादन जिल्हयाच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी श्री संत मिराबाई आईसाहेब पुण्यतिथी सोहळयाच्या समारोप प्रसंगी केले.
पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथील श्रीक्षेत्र मिराबाई संस्थान कवडवाडी येथे 20 वा अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सोमवार दि. 29 जानेवारी रोजी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी संस्थांनच्या मठााधिपती ह.भ.प.राधाताई सानप, आ.जयदत्त क्षीरसागर, विजय गोल्हार, ऍड.सर्जेराव तांदळे, सुधिर घुमरे, विक्रांत हजारी, सुनिल मिसाळ, मधुकर गर्जे, पांडुरंग नागरगोजे, नवनाथ सानप, संतोष राख आदि उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आज जिल्हयात ना.पंकजाताईंच्या माध्यमातून सर्वत्र महिलाराज दिसत आहे याचा धसका अनेकांनी घेतला आहे. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार संत भगवान बाबा करायचे. स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांनी देखील बाबांची शिकवण पुढे चालवत आपल्याला पंकजाताईंच्या रुपाने तिच शिकवण दिली आहे. समाजात क्रांती घडवायची असेल तर निमित्तही घडायलाच पाहिजे. त्यासाठी आज जी विकासाची, समतेची क्रांती घडत आहे ती पंकजाताईंमुळेच घडत आसल्याची त्या म्हणाल्या. तर धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र नसेल तर प्रगती होत नाही असेही त्या म्हणाल्या. स्त्री शक्तीच्या या जमान्यात पंकजाताईंची जी यशस्वी घोडदौड सुरु आहे ती कोणीही रोकु शकत नसल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी बोलताना ह.भ.प.राधाताई सानप म्हणाल्या की, माणसं उगीच मोठी होत नसतात त्यामागे त्यांचे अपार कष्ट, मेहनत असते. स्व.मुंडे साहेबांनी आठरा पगड जाती, धर्म, पंथ यांच्यासाठी कष्ट घेतले म्हणून ते मोठे झाले आणि तेच कष्ट, तीच मेहनत पंकजाताई आणि प्रितमताई घेत आहेत. साहेबाप्रमाणेच आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत असे त्या म्हणाल्या.
यावेळी जयदत्त क्षीरसागर यांचेही भाषण झाले. सुरुवातीस खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते काल्याची हंडी फोडण्यात आली. संस्थानांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मोठया संख्येने महिला, नागरीकांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
Add new comment